Sunday, September 5, 2010

शिक्षकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

परवा म.टा.च्या "श्रावण क्विन"स्पर्धेत एका मुलीला असा प्रश्न विचारण्यात आला की "देशाच्या प्रगतीसाठी कोणत्या गोष्टीची सर्वांत जास्त आवश्यकता आहे..चांगल्या शिक्षकांची कि चांगल्या राजकारण्यांची..?"

यावर त्या मुलीनं अर्थात "चांगल्या शिक्षकांची..कारण ते देशाचे नागरिक घडवतात"असं उत्तर दिलं.
हा इव्हेंट होऊन आज इतके दिवस झाले तरी मनाला पटेल असं उत्तर सापडंत नाहीए..
तुम्ही तुमची मतं कळवा..तुम्हाला काय वाटतं..???

Sunday, July 25, 2010

सल...

सारे कळूनी मागे वळूनी हरवत गेल्या वाटा,
कसले सुख अन कसले आसू फरफट मागे आता..
सारेच कसे गुंतागुंतीचे वाट मोकळी नाही,
सुटूनी पाशांतूनही सार्या मनात सलते काही...

Sunday, July 11, 2010

वक्त से पेहेले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नही मिलता असं ऎकलं होतं पण काही दिवसांपूर्वी याचा प्रत्यय आला.
काही दिवसांपासून एक रियालीटी शो व्यवस्थित follow करतेय.. DID Li'l Masters नावाचा..काही दिवसांपूर्वी त्यामधून वत्सल विटलानी नावाचा अत्यंत गुणी डान्सर बाहेर पडला कारण त्या दिवशीचा त्याचा performance इतरांच्या तुलनेत कमी पडला. जय नायरची ४ जणांची अनेक दिवसांपासूनची अबाधित टीम त्यामुळे कमी झाली. सगळेच हळहळले.
अमॄता नावाच्या एका स्किपर चे एका मागोमाग एक ३ स्पर्धक स्पर्धेतुन बाद झाले..पुन्हा सगळे हळहळले. आता अमॄताकडे उरली होती ती फक्त खुशबू कलगुटकर ही जबरदस्त डान्सर आणि अमॄताचं या स्पर्धेतलं भवितव्य पूर्णत: खुशबूवर अवलंबून होतं. मध्यंतरी याच स्पर्धेत call back एपिसोड झाला पण त्याचाही जय आणि अमॄताला काहीच फायदा झाला नाही कारण त्यातून ना वत्सल पुन्हा आत आला आणि ना अमॄताच्या टीम मध्ये कोणी वाढलं..पुढे call back एपिसोड मध्ये आत आलेले दोघेही जण स्पर्धेतून बाद झाले पण एक खुपंच दुख:द घट्ना घडली ती म्हणजे स्किपर अमॄताच्या खुशबूचा रिहर्सल्स च्या वेळी अपघात झाला आणि तिचा हात फ़्रेक्चर झाला आता मात्र अमॄताच्या bad luckची हद्द झाली..आणि मग बराच उहापोह झाल्यानंतर वत्सलला पुन्हा स्पर्धेत घेण्यात आलंय पण या वेळी त्याला स्किपर अमॄताच्या टीम मधून नाचावं लागतंय.
खुशबू सारखी अत्यंत सुंदर डान्सर आज स्पर्धेत एवडःया दूरवर येउनही त्या स्टेज वर नाचू शकंत नाहीए आणि वत्सल ज्याला या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं होतं तो त्याच्या ओरिजनल स्किपर जय नायरच्या सोबत नाही तर समोर उभा राहिलाय. या सर्वावर कळस म्हणूनच की काय वत्सलच्या performance मुळे अमॄताला काल Skipper of the day किताब मिळाला..मला खरंच आश्चर्य वाटतं वत्सलच्या नशीबाचं आणि नशीबावरचा विश्वास आणखीनच द्रुढ होतोय..शेवटी आपल्यापाशी येते जे आपले असते, ही ओळ खरी ठरली असं वाटलं .

Sunday, July 4, 2010


मी दिवस बांधूनी पदराला अन वेळ हातावर असतो
मी काट्यांवर पळतानाही संसार सुखाने हसतो..


जरी कमी लेखले कुणी तरी मी गुणी असे म्हणताना
अस्तित्व स्वत:चे राखूनही या जगी असे लढताना
पाठीवरती ना हात कुणाचा स्वत: वाट शोधते
काटे मिळती कधी फुले बहरती तरी पुढे चालते
धडपडले वा अडखळले तरी एक स्पर्श मला सावरतो
मी काट्यांवर पळतानाही संसार सुखाने हसतो..
मी समजून उमजून राखून मर्जी सार्यांची वागते
तरी मनी वसे ते स्वप्न स्वत:ला रोज स्वत: सांगते
कधी कोमेजून रडणारी, कधी खळखळून हसणारी
कधी मंदिरात जळणार्या समई सवेच जळणारी
कधी सावरूनी मी बावरूनी स्वछंद मनाने उडते
मी आयुष्याचे गीत आताशा रोज नवे गुणगुणते
सांभाळून परि मी भान जगाचे जीव स्वत:वर जडतो
मी काट्यांवर पळतानाही संसार सुखाने हसतो...

Sunday, June 27, 2010


गेल्या पावसात तु सोबत होतास,
आता सोबतीला पाऊस सुद्धा नाही..
वाट मात्र खुप पाहिली मी..दोघांचीही..
आताशा तुझ्यापर्यंत पोहोचेल अशी वाटही उरली नाही..
कधीतरी दाटून आलं की वाटतं आत्ता बांध फुटेल..
अन कोसळेल तोही जोरात..
पण पोकळ झालेल्या धगात आताशा
कोसळण्याचेही अवसान नाही...

Sunday, January 10, 2010

आठवणी

आठवणींच्या पुस्तकावरची धूळ थोडी साफ करू
सोबतीने घालवलेला एक एक क्षण याद करू
सोन्याची रात्र आणि सोन्याचे दिवस होते..
गोष्टीच्या पुस्तकासारखे मंतरलेले जग होते..
राग होता, लोभ होता..तरी सगळं आपलं होतं
सगळं समजून घेणारं आपलं असं एक नातं होतं..
दिवस सरले, सांज सरली..रात झाली सुरू
आयुष्याच्या रानामधला सुकून गेला तरू..
आता कुणाची वाट पाहायची..
की आपली वाट आपणच शोधायची..
आठवणी पुस्तकातच ठेऊन..
त्यावर अशीच धूळ जमू द्यायची..
त्यावर अशीच धूळ जमू द्यायची...